आजचा दिवस म्हणजे 27 फेब्रुवारीला महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन करण्याची परंपरा आहे. कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी तिच्या सन्मानासाठी आयुष्यभर अथक प्रयत्न केले, मराठी साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो.
आमच्या अध्यापक महाविद्यालयात सुद्धा मराठी भाषा गौरव दिन आज म्हणजेच 27 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनिता भोरे, मराठी विषयाच्या प्राध्यापिका सरिता बडगे आणि प्रा.छाया हिंगे यांनी मराठी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन छात्र शिक्षक निरंजन यांनी केले. यावेळी स्टाफ आणि विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.”














































































































































































