“मराठी भाषा गौरव दिन 2025”
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
आमच्या अध्यापक महाविद्यालयात नुकताच मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अगस्त्या फाऊंडेशनचे विभाग प्रमुख श्री तुकाराम जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विषयाच्या प्राध्यापिका सरिता बडगे यांनी प्राचार्य डॉ सुनिता भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यावेळी सर्व स्टाफ सदस्य उपस्थित होते.